Amravati Crime, Chandur Railway City, Aryan Kalavate Saam TV
महाराष्ट्र

माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला; रुग्णालयात दाखल, पाेलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावतीच्या (amravati) येथील चांदुर रेल्वे शहरात (chandur railway) माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चांदुर रेल्वेच्या मुख्य रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोरील ही घटना आहे. शनिवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली असून या हल्ल्यात माजी नगरसेवक यांचा मुलगा आर्यन कलावटे हा गंभीर जखमी (injured) झाला आहे. (amravati latest marathi news)

आर्यन हा तहसील कार्यालयासमोर चायनीज चाखण्यासाठी गेला हाेता. अचानक त्याच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. आर्यन याच्यावर हा हल्ला केल्यानंतर मारेकरी पसार झाले. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर होत असल्याने त्याला अमरावती हलविण्यात आले आहे असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस (police) घटनास्थळी दाखल झाले. पाेलीसांनी मारेकरूंचा शोध सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेडिशनल आणि मॉडर्न, दोन्ही लूकवर उठून दिसतील असे 5 मंगळसूत्र

LPG Price Hike : सामान्यांच्या खिशाला पुन्हा झटका? LNG महागलं, आता LPG सिलिंडरचेही दर वाढण्याचे संकेत

Railway track ballast: ट्रेनच्या रुळांखाली खडीसारखे दगड का असतात? यामागचं कारण ऐकून व्हाल थक्क!

Maharashtra News Live Update: बीड- दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने केला हल्ला

Mumbai : मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; सागर माळीचे ३८व्या वर्षी निधन

SCROLL FOR NEXT