Chandrayaan-3 Saam TV
महाराष्ट्र

Chandrayaan-3: १४ दिवसांनंतर काय? चांद्रयान-३, प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर पृथ्वीवर परतणार?

Chandrayaan-3 Return To Earth: १४ दिवसांनंतर प्रज्ञान रोव्हारचं काय होणार? ते पृथ्वीवर पुन्हा कसं परतणार असे प्रश्न अनेक सर्वसामान्यांच्या मनात येत आहेत.

Ruchika Jadhav

Pragyan Rover:

चांद्रयान ३ ने यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडलं आहे. १४ दिवस प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरणार आहे. यातुन शास्त्रज्ञांना चंद्रावरील विविध गोष्टींचा शोध लावण्यास मदत होईल. तसेच अनेक रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होण्याची देखील शक्यता आहे. अशात १४ दिवसांनंतर प्रज्ञान रोव्हरचं काय होणार? ते पृथ्वीवर पुन्हा कसं परतणार असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहेत. (Latest Marathi News)

प्रज्ञान रोव्हर सध्या काय काम करत आहे?

चांद्रयान ३ ने लँडिंग केल्यावर प्रज्ञान रोव्हर बहेर पडल्याची माहिती इस्रोने ट्वीट करत दिली आहे. रोव्हर बाहेर आल्याचा व्हिडीओ देखील ट्वीट करण्यात आलाय. आता हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची रासायनिक रचना कशी आहे ते तपासण्याचं काम करत आहे. पुढील काही दिवसांत चंद्रावरील माती आणि खडक यांचे परीक्षण होणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश आहे. त्यामुळे प्रज्ञान रोव्हर १४ दिवस जे फोटो पाठवेल आणि निरीक्षण करेल ते संपूर्ण जगासाठी फायद्याचे ठरणार आहे.

चंद्रयान - ३ पृथ्वीवर कधी परतणार

चंद्रयान - ३ विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोन्हीही पृथ्वीवर केव्हा परतणार हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. मात्र यावर मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञान रोव्हर किंवा लँडर म्हणजेच चांद्रयान तीनमधील कोणताही पार्ट पृथ्वीवर परतणार नाही. १४ दिवस माहिती दिल्यानंतर १५ व्या दिवशी आणि त्यानंतर देखील हे यान आहे तिथेच म्हणजे चंद्रावरच राहणार आहे.

'चांद्रयान ३'चं बजेट

केंद्रीय मंत्री जिंतेद्र सिंह यांनी १४ जुलैला 'चांद्रयान ३' लाँचवेळी या मोहिमेच्या बजेटबद्दल माहिती दिली होती. 'चांद्रयान ३ साठी बजेट जवळपास ६०० कोटी आहे. चांद्रयानसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) आणि देशाचे अभिनंदन', असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT