BJP Leader Chandrashekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

ChandraShekhar Bawankule: काँग्रेसचे काही नेते अस्वस्थ, आम्हाला भेटायला येतात; चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा

Chandrashekhar Bawankule on BJP mission Lotus: निवडून आलेल्या खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये आमचं भविष्य चांगलं नाही. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आम्हाला भेटत असतात. असा चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकार परिषदेत खुलासा केला.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. पराभवानंतर कदाचित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही धडा घेतलेला दिसत नाही. अशातच महाविकास आघाडीतील काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला.

काँग्रेस पक्ष सध्या अस्वस्थ आहे. काँग्रेसने लोकसभेत खोटारडेपणा केला, म्हणून त्यांना काही मतं मिळालीत. असं म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला टोला लगावला. आम्ही ऑपरेशन लोटस करत नाही. याची गरजही पडणार नाही. काँग्रेसचे नेते आम्हाला भेटायला येतात. आमच्याकडून विविध विषयांवर मत घेतात. असा खुलासाही त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेस पक्ष अस्वस्थ कारण..

खोटारडेपणातुन त्यांना काही मतं मिळाली आहेत. आता त्यांच्या निवडून आलेल्या खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये आमचं भविष्य चांगलं नाही. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आम्हाला भेटत असतात. भेटल्यावर दु:ख मांडतात. काँग्रेस नेतृत्वाकडून निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांवर दुर्लक्ष होत आहे. काही नेते या कारणांमुळे अस्वस्थ असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ईडी सीबीआयचं त्याचं नेहमीचे रडगाणं

आम्हाला ऑपरेशन लोटस करण्याची गरज नाही. ईडी सीबीआयचे त्यांचे नेहमीचे रडगाणे आहे. तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात. पण निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही, हे महाविकास आघाडीचे अपयश आहे. मविआतील नेते आम्हाला भेटतात, आम्हाला कुणी विचारत नाही, पक्ष जनप्रतिनिधी म्हणून प्रोत्साहन देत नाही. विकासकामं करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे समर्थन करत नाही. असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT