Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: सोन्याच्या चमच्यात बदामाचं ज्यूस पिऊन मोठे झाले; फडणवीसांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

संजय डाफ

Chandrashekar Bawankule Latest News: ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रोशनी शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोशनी शिंदे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस म्हणत टीकास्त्र सोडलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. (Latest Marathi News)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस अत्यंत संवदेशनशील व्यक्तिमत्व आहे. या राज्याला संवेदनशील गृहमंत्री मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा घरकोंबडा, मी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे यांना घरकोंबडा म्हणत आहे. उद्धव ठाकरे यांना कधी रेशन कार्ड काढताना बघितलं नाही. कधी बाहेर काम केलं नाही'.

'बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा येवढंच त्यांचा परिचय आहे. सोन्याच्या चमच्यात बदामाचं ज्युस पिवून ते मोठे झाले. मोदीजींचे फोटो लावून, विरोधकांची लाळ पुसत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

'उद्धव ठाकरेंसारखी भाषा आम्हाला बोलता येते, आमची नागपुरी भाषा आहे, पण आमचे संस्कार आड येतात. जेलमध्ये असलेल्या मंत्र्यांची लाळ चाटली,

उद्धव ठाकरे बावचळले आहेत. निराश व्यक्ती आत्महत्या करायला निघतो, तसं राजकीय आत्महत्या करायला ते निघाले आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

'भाजप त्यांना सोडणार नाही. जिथे उद्धव ठाकरे जातील, तिथे भाजप विरोध करणार. यानंतर बोलला तर समजा… धमकी म्हणून समजा. उद्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सोडेल. उद्धव ठाकरे हे शुण्य कर्तुत्वाचे व्यक्ती आहेत. - सारं गेलं तरीही सुधारत नाही. वाझे सारखे लोक जेलमध्ये गेले, त्याची लाळ उद्धव ठाकरे चाटत होते. अधिकाऱ्यांना यांनी १०० कोटींची लाच मागितली, असेही बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणतरी गेलं बाबा मला मारलं..., उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

Asambhav: नव्या नात्यातील दरवळ बहरणार; मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रेक्षकांच्या समोर

Whatsapp Number Leak: सावधान! आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, व्हॉट्सअ‍ॅपवरील ३.५ अब्ज युजर्सचे मोबाइल नंबर चोरी

Weight Loss: वजन घटवण्यात सेमाग्लुटाइडचा नवा वैज्ञानिक फॉर्म्युला ठरतोय गेमचेंजर

SCROLL FOR NEXT