Chandrapur: धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात कामगार ठार...(पहा Video) Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur: धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात कामगार ठार...(पहा Video)

वीज निर्मीती केंद्रात कुणाल एंटरप्राइजेस या कंत्राटी कंपनीत कार्यरत कामगाराला वाघाने ठार केल्याची धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर: वीज निर्मीती केंद्रात कुणाल एंटरप्राइजेस या कंत्राटी कंपनीत (company) कार्यरत कामगाराला वाघाने (tiger) ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर (Chandrapur) वीज केंद्र परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. भोजराज मेश्राम (वय- ५८) रा. वैद्यनगर तुकूम असे मृत कामगाराचे नाव आहे. ते बुधवारी रात्रीच्या ९ ते १० वाजेच्या दरम्यान काम आटोपून सायकलने घरी परतत होते. (Chandrapur Workers killed in tiger attack)

पहा व्हिडिओ-

दरम्यान, रस्त्यात वाघाने त्यांच्यावर हल्ला (Attack) चढविला आणि उचलून नेले आहे. त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी मिळाला आहे. त्यांची सायकल रस्त्यावर पडून होती. मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघ फिरत आहे. याविषयी २ दिवसांपूर्वी वीज केंद्राने वनविभागाला (Forest Department) माहिती दिली होती. दरम्यान, वाघाने कामगाराचा ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT