Chandrapur School Bus Accident Saam Digital
महाराष्ट्र

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

Chandrapur Breaking News : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावानजीक उलटली आहे. बसमध्ये ६० विद्यार्थी होते.

Sandeep Gawade

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावानजीक उलटली. यात सुमारे वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत. या बसमध्ये 60 विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांना घेऊन ही बस शाळेकडे निघाली होती. मात्र वाटेत चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल शाळेकडे निघाली होती. बसमध्ये तब्बल ६० विद्यार्थी होते. दरम्यान स्कूल बस हरदोना गावानजीक आली असता चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. चालकाला बस थांबवता आली नाही आणि काही क्षणात बस रस्त्याच्या बाजूला जावून उलटली.

या अपघात २० विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT