Varora Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Varora Vidhan Sabha : वरोरा विधानसभा क्षेत्रात बंडखोरांचे आव्हान; बहुरंगी लढतीने राजकीय समीकरण बदलणार

Chandrapur News : वरोरा मतदारसंघ कुणबी बहुल आहे. यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांनी याच समाजाचे उमेदवार येथे दिले आहेत.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रात चौरंगी- पंचरंगी रंजक लढत अपेक्षित आहे. या क्षेत्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. मुळात महायुती व महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत मानली जात असताना बंडखोरांनी चुरस वाढविली आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

वरोरा मतदारसंघ कुणबी बहुल आहे. यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांनी याच समाजाचे उमेदवार येथे दिले आहेत. काँग्रेसने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे आणि भाजपकडून दिवंगत माजी मंत्री संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट सामना अपेक्षित असताना दोन्हीकडून बंडखोरी झाली आहे. भाजप बंडखोर एहतेशाम अली शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. तर उबाठाचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी बंडखोरी केली. हे दोन्ही उमेदवार आजघडीला आव्हान उभे करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे बहुरंगी लढत इथे अपेक्षित मानली जात आहे. 

भाजपने एहतेशाम अली यांच्यावर नुकतीच निष्कासनाची कारवाई केली आहे. अली यांनी चिन्ह मिळाल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तर ऊबाठाचे जिवतोडे हेही प्रचारात गती राखून आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी भावाच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. एहतेशाम अली हे वरोरा नगरपरिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. काँग्रेसचे दिवंगत मंत्री संजय देवतळे यांचे ते विश्वासू होते. देवतळे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यावर अली सुद्धा भाजपमध्ये गेले. यावेळी उमेदवारी आपल्याला मिळेल; अशी अपेक्षा असताना संजय देवतळे यांचे पुत्र करण यांना ती मिळाल्याने त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. तर जिवतोडे यांना उबाठाकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघात युती आणि आघाडीसोबतच यांचे बंडखोरही मैदानात उतरल्याने इथे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT