Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur : वाघांच्या शिकारीतील बहेलिया टोळीचा म्होरक्याला अटक; राजुरा तालुक्यातून घेतले ताब्यात

Chandrapur News : मध्य प्रदेशातील या बहेलिया टोळीने २०१३ ते २०१५ दरम्यान विदर्भात किमान १९ वाघांच्या शिकारी केल्याचा संशय शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार होते

संजय तुमराम

चंद्रपूर : वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. त्याने मागील काही वर्षांपूर्वी विदर्भात वाघांची शिकार केल्याचा संशय आहे. याच प्रकरणामध्ये अजित राजगोंड याला वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. 

मध्य प्रदेशातील या बहेलिया टोळीने २०१३ ते २०१५ दरम्यान विदर्भात किमान १९ वाघांच्या शिकारी केल्याचा संशय आहे. या शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार होते. त्यांनी वाघांच्या शिकार केल्याचे समोर आले होते. यामुळे वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने २०१५ मध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती. यामुळे वन विभागाने सुटकेचा निश्वास सोडला होता. 

जामिनावर झाली होती सुटका 

दरम्यान सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून न्यायालयाने अजितला शिक्षा ठोठावली होती. मात्र सप्टेंबर २०२४ मध्ये अजित याची जामिनावर सुटका झाल्याने तो जेलबाहेर आला होता. यानंतर म्हणजे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अजित हा राजुरा तालुक्यात आढळून आल्याने त्याला वीण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 

पधकाकडून कसून चौकशी 

मात्र अजितसारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने वन विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. अजित या भागात गेल्या किती दिवसांपासून आहे. त्याने या भागात वाघांच्या शिकारी केल्या का? त्याच्या टोळीचे आणखी किती लोकं या भागात आहेत, यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वन विभागाचे विशेष पथक अजितची कसून चौकशी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT