Chandrapur Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur News : न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने घेतला गळफास; धक्कादायक घटनेनं खळबळ

ब्रम्हपुरी शहरातील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ब्रम्हपुरी शहरातील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना मंगळवारी (6 डिसेंबर) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पौर्णिमा मिलिंद लाडे (वय २७ ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. (Latest Marathi News)

पौर्णिमा ही गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) येथील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी (Chandrapur News) शहरात न्यायालयाच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. सोमवारी रात्री बांधकाम करणारे कामगार कामावरून घरी गेले. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना न्यायालयाच्या गेटवरच तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या आवारात अज्ञात व्यक्तीने घेतला गळफास

बीड जिल्हा परिषदेच्या आवाराच्या परिसरात, रात्री अकराच्या दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. जिल्हा परिषदेच्या समोर असलेल्या हॉटेलच्या अडूला दोरी बाधून, ही आत्महत्या केली आहे. सदरील मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून बीड शहर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. दरम्यान शहर पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवणे सुरू आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT