लाच घेणारी आरपीएफ महिला उपनिरीक्षक गजाआड संजय तुमराम
महाराष्ट्र

लाच घेणारी आरपीएफ महिला उपनिरीक्षक गजाआड

तिकीट नियमबाह्य पद्धतीने काढले म्हणून संगणक संचालकावर गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर - जिल्ह्यातील वरोरा शहरात खाजगी संगणक संचालकाने रेल्वे प्रवासाकरिता एका व्यक्तीला ऑनलाइन तिकीट काढून दिले. हे तिकीट नियमबाह्य पद्धतीने काढले म्हणून संगणक संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये तडजोड करण्याकरता 60 हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला उपनिरीक्षकास रंगेहात पकडण्यात आले.

हे देखील पहा -

वरोरा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलामध्ये गोपिका मानकर उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणात तडजोड करण्याकरिता उपनिरीक्षक गोपिका मानकर यांनी एक लाख रुपयाची मागणी केली. त्यामध्ये साठ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारकर्त्याने याबाबत केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय, नागपूर यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार वरोरा रेल्वे स्थानकावर सापळा रचण्यात आला. रात्रीच्या सुमारास 60 हजार रुपयांची लाच घेताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना रंगेहात त्यांच्या कार्यालयात पकडण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death : ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्रीचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: लोणी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणं उगवलंच नाही

९० कोटींच्या घोटाळ्यात मंत्री अडकला, सीबीआयचा थेट राज्यपालांकडे अर्ज, राजकारणात खळबळ

Pune : पुण्यात भयंकर दुर्घटना! तरूणी धावत्या PMPML बसमधून पडली, मागून येणाऱ्या स्कुल बसने चिरडले

ChatGPT ला चुकूनही विचारू नका या 5 गोष्टी, महागात पडेल

SCROLL FOR NEXT