Chandrapur Collector Vinay Gowda Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur News : जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश; प्रशासनात मोठी खळबळ, काय आहे प्रकरण?

चंद्रपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करा, असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

Chandrapur News : चंद्रपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करा, असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने आदेश दिले आहेत. थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचा आदेश निघाल्याने जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासीच्या जमीन प्रकरणात आयोगाने हा आदेश दिला आहे. एका सिमेंट कंपनीने ही जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याप्रकरणी आयोगापुढे हे प्रकरण सुरू आहे. कुसुंबी शेतजमीन प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने समन्स जारी करूनही त्याचे पालन न केल्याप्रकरणी आयोगाने हा कठोर आदेश २१ फेब्रुवारी रोजी दिला आहे

काय आहे प्रकरण?

जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १६ फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते.

मात्र ते आयोगापुढे हजर झाले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने त्यांना अटक करुन २ मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर ३६ वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा आरोप या पीडित आदिवासींचा आहे. या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र आयोगाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT