chandrapur ambajogai bus accident near borisawant. saam tv
महाराष्ट्र

MSRTC Bus Accident : प्रवाशांचे प्राण वाचविण्यात चालकास यश; चंद्रपूर - आंबाजोगाई बसला अपघात, ३० जखमी

रिपाईचे पदाधिकारी किरण घोंगडे यांनी अपघाताची माहिती ग्रामस्थांना व हट्टा पोलिसांना दिली.

साम न्यूज नेटवर्क

Chandrapur Ambajogai Bus Accident News : आज पहाटे साडे पाचच्या सुमारास बाेरीसावंत नजीक झालेल्या बस अपघातात सुमारे २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Tajya Batmya)

या अपघाताबाबतची पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी : आज पहाटेच्या सुमारास हिंगोली ते परभणी मार्गावर असलेल्या बोरीसावंत नजीक चंद्रपूर आंबाजोगाई बसला अपघात झाला. या अपघाताची माहिती समजताच हट्टा येथून काही पाेलिस कर्मचारी घटनास्थळी तातडीने घटनास्थळी पाेहचले.

या अपघातामधील सर्व जखमींना (injured) तातडीने रुग्णालयात पाठविले. ही बस (एमएच-०९- एफएल-१०२०) आंबाजोगाई आगाराची आहे. हिंगोली ते परभणी मार्गावर असलेल्या औंढा ते हट्टा मार्गावर बोरीसावंत जवळ आली असताना समाेरुन येणा-या ट्रक चालकाने बसला कट मारला.

ट्रकची बसला (bus) धडक बसू नये व प्रवाशांना वाचविण्यासाठी चालकाने बस बाजूला घेतली. त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला अन्यथा दाेन्ही वाहनांची टक्कर झाली असती. मात्र यामध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघाताची माहिती रिपाईचे पदाधिकारी किरण घोंगडे यांना समजली. त्यांनी तातडीने घटनेची माहिती ग्रामस्थांना व हट्टा पोलिसांना दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून जखमी प्रवाशांना मदत केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT