Sanjay Raut And Chandrakant Patil Saam TV
महाराष्ट्र

माझी चेष्टा करणं संजय राऊतांच्या अंगलट येणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा

मी सामना वाचणं बंद केलं आहे, राऊतांवर बोलणंही बंद केलं आहे.

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर : सामनाच्या (Saamana) अग्रलेकातून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रददेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरती घणाघाती टीका केली आहे. 'पंतप्रधान मोदी २२ तास काम करतात. उरलेले २ तासही झोप पंतप्रधानांना येऊ नये यावर संशोधन सुरू आहे.' चमच्यांचे हे विधान ऐकून पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) २ तासांची झोपही उडाली असेल!, अशी टीका राऊतांनी (sanjay Raut) केली आहे. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. माझी राऊतांकडून चेष्टा केली जातेय, मात्र ही चेष्ट आता त्यांच्या अंगलट येणार आहे आहे असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

ते म्हणाले, राऊत माझी वारंवार चेष्टा करतात, ही चेष्टा राऊतांना महागात पडणार आहे. तसंच मी सामना वाचणं बंद केलं आहे आणि राऊतांवर बोलणंही बंद केलं आहे असं पाटील (Chandrakant Patil) म्हणाले ते कोल्हापूरात बोलत होते.

दरम्यान, अहिल्यादेवी स्मारकाती उभारणी ही आमची सत्ता असताना झाली, मग शरद पवार उद्घाटनाला कशासाठी असा सवाल त्यांनी केला. तसंच पवार येणार म्हणून फक्त दोन तारखेपर्यंतच 144 कलम लावलं. लावायचा असेल तर पंधरा दिवस लावा पोलीस यंत्रणेला माझा इशारा हे फार दिवस नाही चालत कोल्हापुरात ही हे सुरू झालय आठ वर्षांपूर्वीच्या केसेस काढल्या जाताहेत. प्रसंगी पोलीस स्टेशनला घेराव घालू,सोडणार नाही असा इशारा त्यांनी पोलिसांनाही दिला.

तसंच किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) सगळ्या मंत्र्यांना भीती आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा बांधून ठेवल्या आहेत. किरीट सोमय्या त्यांचा कर्दनकाळ ठरले आहेत असही पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT