चंद्रकांत पाटील Saam Tv
महाराष्ट्र

Politics : पोलिस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालत आहे

पोलिस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालत आहे. अशी घणाघाती टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

विजय पाटील

सांगली : पोलिस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालत आहे. अशी घणाघाती टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तसेच 'अटॅक इज बेस्ट डिफेन्स' त्यामुळे अंगावर गेल्याशिवाय काही होणार नाही, असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे. सांगलीत भाजपच्या वतीने जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

हे देखील पहा -

भाजपच्या सांगली जिल्हा नूतन कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना आपण वारंवार सांगत होतो की सर्व नेत्यांशी चर्चा करा आणि आज मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे स्वताहून सर्वपक्षीय नेत्यांना बैठक घेत आहेत. असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

नारायण राणेंवरील कारवाई बाबत प्रतिक्रिया >

नारायण राणेंवरील कारवाई बाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या पद्धतीने हा कारभार सुरू आहे, ते पाहता, पोलिस व गावगुंडाच्या जोरावर हे सरकार चालत आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या आपण सक्षम आहोत. 22 महिन्यात एकही केस ते जिंकू शकले नाहीत. काल पण ते हरले आहेत. आज आपल्या सोबत मुंबईत अदृश्य वकिलांची टीम काम करत असून अनिल परब यांच्यावर याचिका दाखल करण्यासाठी काम सुरू आहे. असं ही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, केस दाखल होतात, पण जास्तीत जास्त केस दाखल होणे म्हणजे राजकीय दृष्ट्या चांगली गोष्ट आहे. आज तीन पक्ष शेवटची फडफड करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे.

सरकार स्थापन झाल्यापासून 22 महिन्यात भाजपा कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण, पक्षातील कोणीही फुटला नाही. उलट आम्ही गनिमी काव्याने, काम करत आहोत. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडत आहोत. तसेच ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही निवडणूक भाजपा होऊ देणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT