Rain Alert In Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

येत्या काही तासांमध्ये राज्यातील "या" जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता - हवामान विभाग

येत्या ३ ते ४ जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : राज्यात येत्या ३ ते ४ तासात वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) पडण्याची शक्यता असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (Mumbai Regional Meteorological Department) दिला आहे. हवामान खात्याने म्हटलंय की, येत्या ३ ते ४ तासांमध्ये धुळे, नाशिक आणि नंदुरबार (Dhule, Nashik and Nandurbar) जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यातील IMD हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी 3 मार्चची संध्याकाळ ते 5 मार्च या कालावधीत काही ठिकाणी खूप हलका पाऊस पडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलसह दक्षिणेकडील भारताच्या काही द्वीपकल्पीय भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे असल्याचंही कश्यपी यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT