Weather Update: राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता; पुढील 2 दिवस या जिल्ह्यांना यलो अलर्ट Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता; पुढील 2 दिवस या जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान खात्याने पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यात काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आंध्र प्रदेश मागोमाग महाराष्ट्रावर देखील अवकाळी पावसाचे ढग गडद झाले आहेत. राज्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यात काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा देेण्यात आला आहे.

हे देखील पहा-

मान्सून माघारी परतला असला, तरी देशात काही राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. आंध्र प्रदेशमध्ये पावसाने प्रचंड थैमान घातले आहे. आता महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या (21 आणि 22 नोव्हेंबर) मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पूर्व- मध्य आणि श्चिम- मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांकरिता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, मच्छिमारांना देखील २ दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देखील देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठीगडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

SCROLL FOR NEXT