Beed Breaking News विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: चक्री जुगार अड्ड्यावर नऊ ठिकाणी धाडी! तब्बल 29 आरोपींना अटक

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: शहरातील पेठ बीड भागात पोलीस अधीक्षकांच्या पथकाने 9 ठिकाणी धाडी टाकून, चक्री जुगार खेळविणाऱ्या 9 जणांसह 20 जणांना रंगेहात पकडले आहे. यावेळी रोख 85 हजार रुपयांसह संगणक, लॅपटॉप असा एकूण 3 लाख 90 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे बीड शहरात खळबळ उडाली असून शहरासह जिल्ह्यात चक्री जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात असल्याचे समोर आले आहे. (Beed Breaking News)

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बीड शहरातील चांदणी चौक, कडबा मंडई, रामतीर्थ नाका, एमआयडीसी रोड या भागांत धाडी टाकून चक्री जुगार खेळविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे देखील पहा-

जागोजागी पत्र्याचे शेड थाटून त्यात राजरोस चक्री जुगार खेळविणाऱ्यांच्या संख्येत भर पडू लागली.अनेक बेरोजगार तरुणांना चक्री जुगाराचे आकर्षण वाढले होते. यातून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. या कारवाईमुळे अवैधरित्या चक्री जुगारअड्डा चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार ही कारवाई केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT