Amravati jama masjid Saam TV
महाराष्ट्र

कौतुकास्पद! अमरावतीत जामा मशिदीत रक्तदान करून शिवराज्याभिषेक दिन साजरा

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा अनोखा क्षण अनुभवण्याची संधी अमरावतीकरांना मिळाली.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून रोजी राज्याभिषेक करण्यात आला. संपूर्ण राज्यभर हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. रयतेच्या आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. याच दिनाचे औचित्य साधून अमरावती येथील साबनपुरा जामा मशिदीत रक्तदान करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा अनोखा क्षण अनुभवण्याची संधी अमरावतीकरांना मिळाली. (Amravati Latest News)

अलीकडच्या काळात अमरावतीत हिंदू-मुस्लिम दंगे झालेत. मात्र, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून येथील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोखा जपला. मंदिर, मस्जिद, गुरुद्वार तर कधी बौद्ध लेण्यांवरून समाजात विखार पसरवण्याचे काम काही कट्टरपंथीय धार्मिक लोक करत असतात. याच वातावरणात एकतेचा आणि समानतेचा संदेश देण्यासाठी अमरावतीत मस्जिदमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

दरम्यान, या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रबोधन झाले. यावेळी कार्यक्रमात माजी पालकमंत्री सुनील देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे,काँग्रेसनेते माजी महापौर विलास इंगोले उपस्थित होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT