solapur , teacher, molested , crime news SaamTv
महाराष्ट्र

Solapur News : शिक्षिकेशी लगट, माजी महापाैरांच्या आली अंगलट; गुन्हा दाखल

याबराेबरच तक्रार मागे घे असे सुनावल्याचे महिला शिक्षिकेने तक्रारीत नमूद केले आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur : संस्थेतल्या शिक्षिकेसोबत (teacher) जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवत तसेच तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूरचे (solapur) एक माजी महापौर अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीसह अनैसर्गिक अत्याचार अन् अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. (solapur latest marathi news)

याबाबत मिळालेल्या माहिती अशी - पीडित महिला ही विधवा होती. तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवत माजी महापाैरांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकेन तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन असे धमकावत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. तिने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यानंतर तिच्यावर दबाव आणत तक्रार मागे घेण्यास भाग पाडले हाेते.

तिची इच्छा नसतानाही तिच्याकडून राजीनामा लिहून घेतला. निवृत्तीचे पैसे देण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारातील असे एकूण दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. या तक्रारीवरून माजी महापौरांवर अत्याचाराचा गुन्हा पाेलिसांनी दाखल केला.

दरम्यान पीडितेने याबाबत विरोध करत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिला त्यांनी गावठी बंदूकीचा धाक दाखविला. तसेच भावाला आणि त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. याबराेबरच तक्रार मागे घे असे सुनावल्याचे महिला शिक्षिकेने तक्रारीत नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानजींचे हे उपाय तुम्हाला करतील मालामाल, आर्थिक तंगी होईल दूर

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Apple Milkshake Recipe : व्यायाम करून आल्यावर प्या 'ॲपल मिल्कशेक', दिवसभर रहाल उत्साही

Achyut Potdar Death : सिनेसृष्टीवर शोककळा, 3 Idiots मधील प्रोफेसर काळाच्या पडद्याआड

Hingoli Heavy Rain Flood : पावसाचा जोर वाढला, हिंगोलीत महापुरामुळे दोघांचा मृत्यू, मृतांच्या गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT