nanded crime news , crime news , women sarpanch  saam tv
महाराष्ट्र

Crime News : घरात घुसून महिला सरपंचांना मारलं; चाैघांवर गुन्हा दाखल

महिला सरपंच यांना मारणा-या चारही जणांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

संतोष जोशी

Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात एका महिला सरपंचाला (sarpanch) मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलीसांनी (police) दिली. (Maharashtra News)

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे काल महिला सरपंच यांना मारहाण झाली. महिला सरपंच राधाबाई जोगेवार यांना बालाजी मातावाड आणि माधव दंडेवाड यांच्यासह चार जणांनी रात्री दहाच्या सुमारास घरात घुसून मारलं. आमच्या विरोधात तक्रार का देता म्हणून महिला सरपंच राधाबाई जोगेवार यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Tajya Batmya)

या प्रकरणी चाैघांवर कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सरपंचाला मारहाण केल्याची घटना घडल्याने मारहाण करणाऱ्या चारही जणांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sea Fort : चारही बाजूंनी अथांग समुद्र अन् मध्यभागी भव्य किल्ला, मुंबईजवळच आहे दगडी बेटावरचा ऐतिहासिक जलदुर्ग

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला, उभ्या पिकांवरून फिरवला नांगर

Shocking : रात्री दारू पार्टी करून झोपले, सकाळी उठलेच नाहीत, १९ जणांचा मृत्यू

Sunthach Paani: दररोज सकाळी न चुकता प्या सुंठाचं पाणी; मिळतील हे 6 चमत्कारिक फायदे

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, आयटी इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT