jalna news, vikram zol, vijay zol, arjun khotkar saam tv
महाराष्ट्र

Jalna : उद्याेजकाचे अपहरण, जीवे मारण्याची धमकी; अर्जुन खाेतकरांचा जावई प्रसिद्ध क्रिकेटपटूवर गुन्हा दाखल

हा गुन्हा कदीम जालना पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

लक्ष्मण सोळुंके

Cricketer Vijay Zol : अर्जुन खोतकर (arjun khotkar) यांचा जावई माजी क्रिकेटपटू विजय झोल (Cricketer Vijay Zol Latest Marathi News) आणि त्याचा भाऊ विक्रम (vikram zol) याच्यासह पंधरा ते वीस जणांवर उद्याेजकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जालना येथील घनसावंगी पोलिस (police) ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योजक किरण खरात यांच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी रात्री उशिरा झाेल बंधूंवर गुन्हा दाखल केला. (Breaking Marathi News)

गुंतवणूकीतील नुकसानीसाठी किरण खरात यांना जबाबदार करून खरात यांचं त्यांच्या पुण्यातील (pune) घरातून अपहरण करत त्यांचं जालन्यातील (jalna) सराफनगरमधील घर आणि चार प्लॉटचं खरेदीखत केलं. तसेच उद्योजक खरात यांच्या जालना आणि मंगरूळ येथील घरात काही जणांसह बळजबरीने घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खरात यांनी झाेल बंधूंच्याबाबत केली.

उद्योजक किरण खरात यांच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी रात्री उशिरा झाेल बंधूंवर गुन्हा दाखल केला. प्रशांत महाजन (पोलीस निरीक्षक, घनसावंगी पोलीस ठाणे) म्हणाले खरात यांच्या तक्रारीवरुन विजय झाेल आणि विक्रम झाेल यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा (case) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कदीम जालना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Issues: पैशांमुळे नवरा-बायकोमध्ये वाद होतायेत? मग या टिप्स करतील सगळ्या समस्या दूर

Naagin Actress : मौनी रॉय ते तेजस्वी प्रकाश; कोणकोणत्या अभिनेत्री झळकल्या 'नागिन'च्या भूमिकेत

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Maharashtra Local Body Elections : आगामी निवडणुका पुढे ढकलणे अशक्य, आयोगाच्या भूमिकेने मविआला धक्का | VIDEO

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; २ बड्या नेत्यांकडून रामराम, भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित

SCROLL FOR NEXT