Jitendra Awhad Controversial Statement saam Digital
महाराष्ट्र

Jitendra Awhad Controversial Statement: वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत, पुणे, शिर्डीत गुन्हे दाखल

Jitendra Awhad Controversial Statement: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना वादग्रस्त वक्तव्य चांगलंच भोवलं असून त्यांच्याविरोधात पुणे आणि शिर्डीत गुन्हा दाखल झाला आहे.

Sandeep Gawade

Jitendra Awhad Controversial Statement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरात वादंग उठल्यानंतर आव्हाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना हे वादग्रस्त वक्तव्य चांगलंच भोवलं असून त्यांच्याविरोधात पुणे आणि शिर्डीत गुन्हे दाखल झाले आहेत. शहर भाजपच्यावतीने याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी (भारतीय दंड संहिता कलम २९५ - अ ) हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शिबिरात आव्हाड यांनी आपल्या भाषणात "प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते." अशा स्वरूपाचे वादग्रस्त व समाजात तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी केलं होतं. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान धीरज घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत, जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्याचा कार्यक्रम आहे, या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह वक्तव्य करून आव्हाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखविल्या आहेत. आक्षेपार्ह व प्रक्षोभक वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखविल्याने आव्हाड यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे,असे घाटे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT