Raju Shetti 
महाराष्ट्र

चुकीला माफी नाही! सरकाराल गुडघे टेकायला लावणार : राजू शेट्टी

विजय पाटील

सांगली : पूरग्रस्त व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी काढलेल्या माेर्चानंतर इस्लामपूर पाेलिस ठाण्यात माजी खासदार राजू शेट्टी Raju Shetti, माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह सुमारे साडे तीनशे ते चारशे आंदाेलकांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री शिवाजीराव नाईक, तसेच इस्लामपूर नगरपालिकेचे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील उपस्थित होते.सरकारने पूरग्रस्तांना दिलेली मदत पूरेशी नाही तसेच पूरग्रस्तांना वेळेत माेठ्या स्वरुपात मदत मिळावी यासाठी स्वाभिमीनी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी नुकताच काेल्हापूरात माेर्चा काढला. त्यानंतर मंगळवारी (ता.२४) त्यांनी पूरग्रस्त व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूर येथे माेर्चा काढला.

यावेळी शेट्टी यांनी मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकले आहे. त्यांना गुडघे टेकायला लावणार त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला. त्यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, इस्लामपूर पालिकेचे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील उपस्थित होते.

दरम्यान माजी खासदार राजू शेट्टींसह साडे तीनशे ते चारशे आंदाेलकांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT