Hingoli News Saam Tv
महाराष्ट्र

CM शिंदेचा पुतळा दहन करणं पडलं महागात; 14 जणांविरोधात गुन्हा

आंदोलन करणाऱ्या १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

संदीप नागरे

हिंगोली - राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यानंतर शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? हा तिढा सुप्रीम कोर्टात प्रलंबीत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आयोगाने गोठवलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठावल्या नंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हिंगोलीच्या (Hingoli) पांगरा शिंदे गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत, शिंदे यांच्या विरोधात पन्नास खोके एकदम ओके, एकनाथ शिंदे गद्दार हैं अशा घोषणा देत आंदोलन केले होते. (Hingoli Latest News In Marathi)

त्यानंतर आता हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशाने कुरुंदा पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करत, मुंबई पोलीस अधिनियम 135 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लघण करणे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये विजय शिंदे,गजानन शिंदे,शंकर शिंदे, सोपान शिंदे, कल्याण शिंदे, सुधाकर शिंदे, सुनील शिंदे यांच्या सह ऐकून दहा जणांचा समावेश आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT