Indurikar Maharaj saam tv
महाराष्ट्र

MNS: इंदुरीकर महाराजांच्या किर्तनास हजारोंची गर्दी; मनसे जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

विनोद जिरे

बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. नांदुरघाट येथे इंदुरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) किर्तनाचा कार्यक्रम धस यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता. या किर्तन कार्यक्रमास मोठी गर्दी झाली होती.

बीडच्या (beed) नांदुरघाट गावात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाला हजारो लोक एकत्र आल्याने सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना नियमांचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं चित्र दिसून आलं. या गाेष्टीकडे साम टीव्हीने देखील लक्ष वेधलं हाेते.

या बातमीची दखल घेत प्रशासनाने सोहळ्याचे आयोजक मनसेचे (mns) जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यावर जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी १८८ प्रमाणे केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच कोरोना काळात गर्दी जमवल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप चॅटमध्ये बदल होणार, वापरकर्त्यांना 'हे' नवीन अपडेट मिळणार

Pune Shocking: 'आई-बाबा माफ करा'! ७ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी IT इंजिनिअर पियुषची भावनिक चिठ्ठी

Maharashtra Live News Update: भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांच्या गर्दीचा उद्रेक

Government Employee : सरकारी कर्मचाऱ्यांनो, सोशल मीडिया वापरताना जरा जपून; अन्यथा कारवाई, नवी नियमावली आली!

SCROLL FOR NEXT