Aurangabad crime update, Aurangabad, Mahavitran saam tv
महाराष्ट्र

Crime : ती येताच ताे फिरवायचा अश्लील प्रतिमेवर हात; महावितण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

सुरुवातीला या प्रकाराबाबत दुर्लक्ष केले गेले. परंतु अनेकदा असं घडल्यानं पिडितेने तक्रार दिली.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Aurangabad Crime News : औरंगाबाद महावितरणच्या (mahavitran) अधीक्षक अभियंता कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. आपल्या कार्यालयात महिला आल्यावर टेबलवर ठेवलेला पेपर वेटच्या आकारातील नग्न अवस्थेतील महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून हात फिरवून अधीक्षक अभियंता वाईट नजरेने त्यांच्याकडं पाहात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित महिला काही कामानिमित्त अधीक्षक अभियंता केबिनमध्ये गेल्यावर टेबलवर ठेवलेल्या पेपर वेटच्या आकाराच्या नग्नावस्थेतील महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून मुद्दाम हात फिरवायचे तसेच वाईट नजरेने पाहायचे असे तिने पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

ही बाब अनेकदा पिडितेस खटकली. मात्र त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु दिवसेंदिवस हा प्रकार वाढत गेल्याने पीडितेने अखेर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी (police) महिलेच्या तक्रारीनूसार प्रवीण दरोली (अधीक्षक अभियंता) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT