Manoj Jarange  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange news : मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या कारची तोडफोड, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Jalna Crime News : मनोज जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या कारवर मनोज जरांगे यांचे फोटो असल्याने तोडफोड झाल्याची बोललं जात आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna News :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या आंदोलनला आता वेगळंच वळण लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्याच्या कारची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

मनोज जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या कारवर मनोज जरांगे यांचे फोटो असल्याने तोडफोड झाल्याचं बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर काळकुटे हे गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांची भेटी घेऊन घरी निघाले होते. वडिगोद्री फाटा येथील एका पेट्रोल पंपासमोर त्यांनी कार थोडा वेळ थांबवली होती. त्यावेळी काही अज्ञातांनी येऊन त्यांच्या कारची तोडफोड केली. (Latest Marathi News)

या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही आमच्या गाड्या फोडणार तर आमच्याकडेही जशास-तसे उत्तर द्यायला पर्याय आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याप्रकरणी गोंदी पोलिसांत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आंदोलनात फूट?

राज्य सरकारने देऊ केलेलं आरक्षण मनोज जरांगे यांनी नाकरलं असून ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली आहे. यावरुन मराठा आंदोलनात फूट पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनातील माजी सहकारी अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News : मान्सून गोव्यात दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज आला समोर

Pune Crime: पुण्यात रक्तरंजित थरार! विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची हत्या, झोपेत असताना चाकूने सपासप वार करत संपवलं

एकही पिंपल दिसणार नाही! चमकदार त्वचेसाठी आजच बदला 'या' ५ वाईट सवयी

Lifestyle habits: महिलांनो...तुम्हाला या ५ सवयी असतील तर अकाली दिसू शकता वृद्ध!

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

SCROLL FOR NEXT