Chhatrapati Sambhaji Nagar Car Accident  Saam TV
महाराष्ट्र

VIDEO: ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला, सुसाट कारने दोघांना उडवलं; संभाजीनगरमधील थरारक घटना

Sambhaji Nagar News: कारचालकाने ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबल्याने कार सुसाट वेगाने धावली. काही क्षणातच रस्त्यावरून पायी चालणाऱ्या दोघांना कारने जोरदार धडक दिली.

Satish Daud

Chhatrapati Sambhaji Nagar Car Accident

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक थरारक घटना समोर आली आहे. कारचालकाने ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबल्याने कार सुसाट वेगाने धावली. काही क्षणातच रस्त्यावरून पायी चालणाऱ्या दोघांना कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर कार थेट रस्त्याच्या शेजारील असलेल्या हॉटेलात शिरली. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना पुंडलिकनगर परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारच्या धडकेत दोघे जखमी झाले आहेत. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील (Viral Video) समोर आला आहे.

व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पुंडलिकनगर परिसरातील रस्त्याच्या कडेला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक कार उभी होती. कारचालक हा नवीन असल्याने त्याने ब्रेकऐवजी कारचा एक्सीलेटर दाबला. (Latest Marathi News)

त्यामुळे क्षणार्धात कार अनियंत्रित झाली. सुसाट वेगात असणाऱ्या कारने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या दोघांना उडवलं. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलात शिरली. घटनेनंतर स्थानिकांनी मदतकार्य करीत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, 600 कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार

Slow Vande Bharat Express: देशातील पहिली सर्वात स्लो वंदे भारत; १६० ऐवजी ५०च्या स्पीडने धावणार; कारण काय?

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, ५ ते ६ जण गंभीर जखमी; नेमकं कारण काय?

Turmeric For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर हळद कशी लावावी?

BJP Rajya Sabha Candidates: राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले, विनोद तावडेंसह १० नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT