Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : शिर्डीहून परतणाऱ्या साईभक्तांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कार डिव्हायडरला धडकली, टायर फुटले

Washim Samruddhi highway Accident : गाडीसमोर रोही आल्याने चालकाने गाडीचा अचानक ब्रेक मारला. मात्र त्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला जाऊन धडकली.

प्रविण वाकचौरे

मनोज जयस्वाल

Washim Accident News :

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर कारचा अपघात झाला आहे. अपघातात कारमधील 7 जण जखमी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पोहाजवळ लोकेशन 190 वर हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारच्या समोर अचानक रोही आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गाडीसमोर रोही आल्याने चालकाने गाडीचा अचानक ब्रेक मारला. मात्र त्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला जाऊन धडकली. गाडीचे दोन्ही टायर देखील फुटले. (Latest Marathi News)

साईबाबाच्या दर्शनावरुन परतत होते भाविक

गाडीतील जखमी हे चंद्रपूरचे राहणारे आहेत. सर्वजण शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन चंद्रपूरला परतत होता. मात्र वाटेतच त्यांच्या वाहनाला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT