Accident , Beed , Women Saam Tv
महाराष्ट्र

Beed : भीषण अपघातात महिलेचा मृत्यू; पती आणि मुलगी गंभीर जखमी

ज्योती झंवर (वय ४५) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातून (Beed) अपघाताची एक भयंकर घटना समोर आली. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या कोळवाडीलगत, भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) एक महिला जागीच ठार झाली तर दोघे जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Beed News Today)

ज्योती झंवर (वय ४५) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र झंवर (वय ४८) हे आपल्या पत्नी ज्योती आणि मुलगी रजत (वय १९) यांच्यासह औरंगाबादहून अंबाजोगगाईच्या दिशेने येत होते.

जितेंद्र यांनी बीडच्या पुढे मांजरसुंबाघाट ओलांडल्यावर, एका हॉटेलसमोर थांबून थोडावेळ आराम करण्याचा निर्णय घेतला. मात्र घाट सुरु होण्यापूर्वीच कोळवाडी येथे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरील एका ट्रकला कार मागच्या बाजूने धडकली.

या भीषण अपघातात एअर बॅग उघडल्याने जितेंद्र हे सुखरूप बचावले, मात्र शेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी जितेंद्र आणि त्यांची मुलगी रजत हिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या पत्नी ज्योती यांचा जागीच मृत्यू झाला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरसह विदर्भातील इतर ४ जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Salman Khan : "राजकारण करू नका..."; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचा फुल पाठिंबा, पाहा भाईजान नेमकं काय म्हणाला?

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT