Ambernath Accident Saam Tv
महाराष्ट्र

Ambernath Accident : भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली, 1 ठार, 5 जखमी

Ambernath Accident : भरधाव वेगाने जाणारी एर्टीगा कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमधील (Ambernath) लोकनगरी बायपास रस्त्यावर मध्यरात्री कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईतील (Mumbai) एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भरधाव वेगाने जाणारी एर्टीगा कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे. (Ambernath Accident News)

माहितीनुसार, अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी एर्टीगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकली. कारचा स्पीड प्रचंड असल्याने डिव्हायडरला धडकताच ती जाग्यावर उलटली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अपघात इतका भीषण होता की, या घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी झाले.

जखमी झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

LPG Cylinder : दिवाळीपूर्वी या सरकारचा मोठा निर्णय! १ गॅस सिलिंडर मिळणार फ्री; काय आहेत नियम?

Sleep Problems: तुमची झोप नीट होत नाहीये? रोजच्या या ५ सवयींमुळं उद्ध्वस्त होतेय रात्रीची विश्रांती

Hot Chocolate Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा झटपट टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT