'त्या' जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित SaamTv
महाराष्ट्र

'त्या' जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाकडून स्थगित.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’ चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. By-elections of 'those' Zilla Parishad and Panchayat Samiti postponed

राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी केली.

हे देखील पहा -

श्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते.

त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचार संहितादेखील आजपासून शिथिल करण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटावरची चरबी होईल १० दिवसात कमी, दररोज फक्त १ चमचा प्या बडीशेपचे पाणी आणि पाहा आश्चर्यकारक बदल

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४१व्या वर्षी निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

HSC-SSC Result 2026: CBSEचा रिझल्ट 35 दिवसात लागला, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी-बारावीचा कधी लागणार?

Bhooth Bangla Collection : अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, 'धुरंधर २'ला टाकले मागे?

Maharashtra News Live Update: पुण्यात हवाईदलाच्या विमानाला अपघात झाल्यानं विमान वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT