धक्कादायक! बस चालकाने बसमध्येच केली आत्महत्या... (व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! बस चालकाने बसमध्येच केली आत्महत्या... (व्हिडिओ)

सुभाष तेलोरे असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही, अहमदनगर

अहमदनगर - संगमनेर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बसस्थानकात एका एसटी चालकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुक्कामी थांबलेल्या बस मध्येच या चालकाने आत्महत्या Suicide केली. कर्जाला Loan कंटाळून या बस चालकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुभाष तेलोरे असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.

पाथर्डीहुन नाशिकला Nashik जाणारी ही बस होती. काल संगमनेरला ही बस आली होती. संगमनेर बस स्थानकात डिझेल भराय होते मात्र डिझेल शिल्लक नसल्याने या गाडीला संगमनेर बस स्थानका मध्येच मुक्काम करावा लागला.

रात्री चालक आणि वाहक बस मध्ये झोपले होते. सकाळी फ्रेश होण्यासाठी वाहक उठल्यावर त्यांच्या समोर हे दृश्य दिसल्याने त्याने तातडीने इतर सहकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. वेळेवर न होणारे पगार आणि आर्थिक संकटाचा सामना होत नसल्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT