Solapur Saam tv
महाराष्ट्र

साखरपुड्याला गेलेल्या हॉटेल व्यवसायिकाच्या घरी चोरी; साडेआठ लाखांचे सोने चोरीला

या प्रकरणी अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर - हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथील हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल 8 लाख 55 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. हा चोरीचा प्रकार काल पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. सोलापुरातील (Solapur) प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक अफसर मोहम्मद शफी खान हे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मावशीच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी पुणे येथे गेले होते.

हे देखील पहा -

या दरम्यान अज्ञातांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांमध्ये ठेवलेले एकूण 8 लाख 55 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. अफसर खान हे काल पहाटे पुणे येथून सोलापुरात आले.

घरी आल्यानंतर त्यांना बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसून आले. आत जाऊन पाहिले असता, कपाट फोडून चोरी झाल्याचे आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडिसी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान मंत्री चंडक अंगण परिसरातीलच हार्डवेअरचे व्यापारी जुनेस तिम्बसवाला यांचेही घर फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. घरातील कपाट करून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे लक्षात आले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT