50 झोपड्यांवर बुलडोझर; महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न! SaamTvNews
महाराष्ट्र

50 झोपड्यांवर बुलडोझर; महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न!

पोलीस आणि प्रांत अधिकारी यांना अनेक वेळा विनवण्या करून देखील तिचे घर तोडण्यात आले.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : विरार अर्नाळा मध्ये 16 फेब्रुवारी रोजी महसूल विभागाने 50 झोपड्या उध्वस्त केल्या होत्या. या कारवाई दरम्यान एका महिलेने घर न तोडण्याची विनंती अधिकाऱ्यांस केली. पोलीस आणि प्रांत अधिकारी यांना अनेक वेळा विनवण्या करून देखील तिचे घर (House) तोडण्यात आले. शाईन सय्यद असे या महिलेचे नाव असून कारवाई दरम्यान तिने विष प्राशन केले होते. याचा व्हिडिओ (Video) आता समाज माध्यमावर वायरल होत आहे.

हे देखील पहा :

शाईन सय्यद (34) यांच्या दोन मुली आहेत. आई आणि या दोन्ही मुली मासे विकण्याचे काम करतात. कर्ज घेऊन त्यांनी विरार (Virar) मधील अर्नाळा परिसरात झोपडे बांधले होते. मात्र, महसूल विभागाच्या कारवाई मुळे अर्नाळा परिसरातील 50 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या वेळी शाईन सय्यद यांनी झोपडी ना तोडण्यासाठी प्रांत अधिकारी यांना अनके विनवण्या केल्या. मात्र, कोणी ऐकत नाही म्हणून शाईन सय्यद यांनी विष प्राशन केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

SCROLL FOR NEXT