Jalna Ambad Snake News Saam TV
महाराष्ट्र

Jalna News : दावणीला बांधलेल्या बैलासमोर नागाने काढला फणा; पुढे काय झालं? पाहा VIDEO

सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.

लक्ष्मण सोळुंके

जालना : सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बिळात पाणी गेल्याने सापांचा मुक्त संचार देखील वाढला आहे. त्यामुळे ठिकाणी विषारी साप नागरिकांच्या नजरी पडत आहेत. अशीच एक घटना जालना (Jalna) जिल्ह्यात घडली. शेतकऱ्याने दावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र दावणीला बांधलेला बैल जराही या नागाला न घाबरता मोठ्या तोऱ्यात टाईट उभा राहिला. (Jalna Todays News)

समोर फणा काढून डोलत असलेल्या नागाचा जराही या बैलावर परिणाम झाला नाही. सदरील प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे घडला. सापासमोर तोऱ्यात उभ्या असलेल्या या बैलाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केलीये.

अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील शेतकरी सोनाजी जाधव यांच्या शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आलं होतं. या ठिकाणी बैल चारा खात असताना बैलासमोर अचानक पाच फूट लांब असलेला नाग आला. आणि बैलासमोर येऊन फणा काढून सलग 20 मिनिटे उभा राहिला. (Jalna Latest Marathi News)

या सापाने बैलाला घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला. पण बैल काही डगमगला नाही.ही बातमी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांपर्यंत गेली आणि बघता बघता रस्त्यावर गर्दी झाली.पण कुणीही नागाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला नाही.सगळे शांत उभे राहून नाग आणि बैलाला पाहू लागले.

तब्बल 20 मिनिटांपर्यंत हा नाग बैलासमोर फणा काढून उभा राहिला. पण बैल जराही डगमगला नाही आणि नागानेही त्याला ईजा पोहचवण्याची हिंमत केली नाही. अखेरीस नागाने माघार घेत तेथून धूम ठोकली आणि उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी बैलाचे कौतुक करत सुटकेचा निश्वास टाकला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट,जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Maharashtra Live News Update: श्रीरामपूरमध्ये हॉटेलवर छापा; घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर उघड, 10 सिलिंडर जप्त

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT