Buldhana Harish Wankhede Sucide Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

Buldhana Sucide News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात लग्न न जुळल्याच्या नैराश्यातून २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या. आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे घेतला टोकाचा निर्णय. पोलिसांचा तपास सुरू.

Alisha Khedekar

  • बुलढाण्यात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • लग्न न जुळल्यामुळे नैराश्य असल्याची माहिती

  • आर्थिक अडचणींमुळे तणाव वाढला होता

  • संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावातील घटना

  • पोलिसांकडून तपास सुरू

संजय जाधव, बुलढाणा

Buldhana Harish Wankhede Sucide बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे एका तरुणाने टोकाचा निर्णय घेत आपलं जीवन संपवलं आहे. धक्कादायक म्हणजे भूमिहीन व अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या तरुणाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव हरिष अरुण वानखडे (वय २८) असे आहे. हरिष हा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील रहिवाशी आहे. हरिष हा गरीब कुटुंबात लहानचा मोठा झाला. मागील दोन ते तीन वर्षांपासून त्याचे वडील त्याच्या लग्नासाठी प्रयत्न करत होते.

मात्र घरातील परिस्थिती हलाखीची. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला मुलगी देण्यास कोणीही तयार होत नव्हते. यामुळे तो सतत तणावात असायचा. आपलं लग्न होणार नाही या चिंतेने त्याने टोकाचा निर्णय घेतला. घरातील सर्व सदस्य आपल्या कामावर गेल्यानंतर हरिषने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन संपवले. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच हरिषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान हरिषच्या अचानक जाण्याने त्याच्या आईने हंबरडा फोडत दुःख व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra News Live: ठाकरेसेनेचे नेते वसंत मोरे यांना अटक

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT