three cattle died due to lightning Saam Tv News
महाराष्ट्र

कष्टाच्यावेळी साथ दिली, कुटुंबाच्या सदस्यांसारखं वागवलं, वीज कोसळल्याने तीन गुरांचा मृत्यू; शेतकऱ्याचा शेतातच हंबरडा

Buldhana Three Cattle Die due to Lightning Strike : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात सावखेड तेजन येथील शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या शेतात वीज पडून तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Prashant Patil

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात सावखेड तेजन येथील शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या शेतात वीज पडून तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आंधळे यांनी लिंबाच्या झाडाखाली पाच जनावरे बांधलेली होती. त्याचदरम्यान, वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट सुरू झाला. दुर्दैवाने वीज थेट झाडावर कोसळली आणि त्याच्या झटक्याने तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेल्या जनावरांमध्ये १ गाय, १ गोऱ्हा आणि १ बैल यांचा समावेश आहे. उर्वरित दोन जनावरे किरकोळ जखमी झाली आहेत.

दरम्यान, घडलेल्या घटनेनं आंधळे कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावलं असून, त्यांच्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या जनावरांचं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्राममहसूल अधिकारी विष्णू थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुंढे यांनी मृत जनावरांचं शवविच्छेदन केलं. यावेळी ग्राममहसूल अधिकारी विष्णू थोरात यांनी ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना वीज कोसळण्याच्या संभाव्य धोक्याबाबत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट

राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा तडाखा बसत असतानाच राज्यावर अवकाळीचेही ढग घोंघावत आहेत. यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT