बुलढाणा थरारक..! धावत्या एस टी बस चे निखळले चाक...  संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाणा थरारक..! धावत्या एस टी बस चे निखळले चाक...

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथून शेगावकडे येणाऱ्या तेल्हारा आगाराचे एसटी बसला कालखेड गावाजवळ अपघात होता होता वाचला

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथून शेगावकडे येणाऱ्या तेल्हारा आगाराचे एसटी बसला कालखेड गावाजवळ अपघात होता होता वाचला आहे. चालकाच्या प्राण गावधानाने बसचा अपघात टळला आहे. या अपघातात प्रवासी जखमी झाले नाहीत. धावत्या बसचे मागील एक चाक निखळलेल्याने नंतर काही अंतरापर्यंत सदर बस राशीत धावत होती. चालकांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राखत एस टी बसला नियंत्रणात करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे काही ना काही प्रताप समोर येत असतात पण हा प्रकार मात्र, अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतणारा होता. तेल्हारा येथून निघालेल्या बसचे मागचे एक चाक पूर्णपणे निखळलेले होते. शेगावकडे ही बस मार्गावर धावतच होती. मागचे चाक निखळले की ही बस उलटी- पलटी होणार हे उघड होते. दुसरे चाकही हळू-हळू ते निघून पडण्याच्या बेतात होते. हे चाक निघताच बसला मोठा अपघात होणार हे स्पष्ट असले तरी याची कुणालाच चाहूल नव्हती.

मात्र चालक यु. एम. माहोकार यांनी प्रसंगावधान राखत एस टी बसला नियंत्रित केल्यामुळे पुढील अनर्थ टाळला आहे. यानंतर चालक मोहोकर आणि वाहक वानखडे यांनी सर्व प्रवाश्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले आहे. आणि तेल्हारा आगारातून तातडीची मदत मागविली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skirt Top for Girls: कॉलेज आणि ऑफिसाठी ट्राय करा हे ७ लेटेस्ट ट्रेंडी स्कर्ट टॉप; मिळेल फॅशनेबल ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update: जालन्यात कापड दुकानातून तब्बल 21 धारदार तलवारींचा साठा जप्त

Shirwale Recipe: कोकणातील स्पेशल नारळाच्या दुधातील शिरवाळे कसे बनवायचे? वाचा रेसिपी

Marathi Bhasha Din History : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी; मराठी भाषेचा इतिहास काय? कवी कुसुमाग्रजांविषयी ही माहिती प्रत्येकाने एकदा वाचाच

Kokam Sharbat Recipe: उन्हाळ्यात थंडगार कोकम सरबत कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT