Buldhana Rain News Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Rain News: बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! नदी नाल्यांना पूर; घरांमध्ये पाणी शिरले.. अनेक गावांचा संपर्क तुटला

Buldhana Heavy Rain: शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana Rain Update: शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.

तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. तालुक्यातील असंख्य गावातील नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षेसाठी आश्रय घेतला आहे. तसेच तालुक्यातील १४० गावांचा संपर्क तुटला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातील लाडणापूर, रुधाना, पंचाळा, उमरा, वडगाव वान, वानखेड बावनबिर, टूनकी, आलेवाडी, सोनाळा, एकलारा बानोदा, आदी गावांमध्ये नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पूरामूळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बावनबिर येथील केदार नदी, आलेवाडी, टूनकी येथील नदी, सोनाळा येथील कचेरी नदी, लेंडी नाल्याला प्रचंड पूर आला असून दुथडी भरून वाहू लागले आहे. (Buldhana Rain)

मुसळधार पावसामुळे कल्याण ग्रामीण जलमय..

कल्याण डोंबिवलीमध्ये आज पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. कल्याण ग्रामीण भागातील आडवली गावात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले तर काही इमारती,चाळींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: RSS च्या शताब्दी वर्षाचा समारोप रेशीमबाग मैदानावर विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाने होणार

जगभरात Gen Z आंदोलनांचा भडका, सत्ताधाऱ्यांंविरोधात नागरिक रस्त्यावर

Gokul Election 2026: सतेज पाटलांनी विरोधकांना दाखवलं आस्मान; वाचा विजयी उमेदवरांची यादी

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT