Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: दारूबंदीसाठी महिला आक्रमक; ठाणेदारांना दिले निवेदन

दारूबंदीसाठी महिला आक्रमक; ठाणेदारांना दिले निवेदन

संजय जाधव

बुलढाणा : जळगाव जामोद (Jalgaon) तालुक्यातील सुनगाव हे जवळपास 11 ते 12 हजार लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात (Buldhana) अवैध गावठी दारू विक्री केली जाते. तसेच अवैध धंदे चालू असून या ठिकाणी अवैधरीत्या सर्वच कंपनीची दारू सहज मिळत आहे. या विरोधात महिला आक्रमक झाल्‍या असून दारूबंदीसाठी निवेदन दिले. (Tajya Batmya)

काही अवैध दारूची दुकाने शाळेच्या 50 मीटरच्या परिसरामध्ये असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना (Student) काही असंतोषी दारुडे नाहक त्रास देताना दिसतात. तसेच काही विद्यार्थीही दारू प्यायाला लागले आहेत. त्यातच सुनगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळही अवैध देशी दारू गावरान दारू विक्रीचा धंदा सुरू असून मध्दधुंद लोक दारू पिऊ त्या ठिकाणी शिवीगाळ करतात.

अखेर महिलांची धडक

अनेक वेळा नागरिकांनी तेथील दारू विक्रेत्याला सांगितले. परंतु त्याने अरेरावीची भाषा वापरून खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या नागरिकांना देत आहे. हे सर्व धंदे बंद करण्यात यावेत; या मागणीसाठी शेकडो महिलांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देऊन मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे यांच्‍यासह असंख्य महिलांनी पोलीस स्टेशनवर धडक दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT