Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात अतिसाराने तिघांचा मृत्यू; १५ किमी झोळी करून नेले मृतदेह, गोमाल गावात वैद्यकीय पथक रवाना

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहन जायला रस्ता नाही. अनेक जणांना अतिसाराची लागण झाली आहे.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या दुर्गम अशा गोमाल या गावामध्ये अनेकांना अतिसाराची लागण झाली आहे. यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे जळगाव जामोद व मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. 

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहन जायला रस्ता नाही. अनेक जणांना अतिसाराची लागण झाली आहे. यामुळे सागरीबाई हिरू बामण्या (वय १८), जिया अनिल मुजालदा (वय २) व रविना कालू मुजालादा (वय ५) या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य प्रशासनाला या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. त्यामुळे गोमाल गावात अतिसाराची लागण असल्यावरही बुलढाणा आरोग्य प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती आहे. 

रास्ता नसल्याने सुविधा पोहचेना 

गोमाल गावात जाण्यासाठी देखील चांगला रस्ता नाही. यामुळे अतिसाराची लागण झाल्यानंतर या रुग्णांना रुग्णालयात न्यायला वेळ झाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर मृत्यूनंतरही या रुग्णांचे मृतदेह गावात न्यायला १५ किलोमीटर झोळीत टाकून न्यावे लागले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ता नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जळगाव जामोद तालुक्यात विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी व भूमिपूजनासाठी दौऱ्यावर आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव गोमाल गावाला भेट देतात का हे बघणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT