Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सकाला निलंबित करा; कारभाराच्या चौकशीची मागणी

Buldhana News : अजूनही कारवाई होत नसल्याने बेंडवाल यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भ्रष्टाचार केला असून त्यांच्या (Buldhana) कारभाराची चौकशी करावी. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी करत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल यांनी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केला आहे. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी शिंदे गटाचे शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल यांनी संबंधित विभागासह आरोग्य मंत्र्यांकडे देखील तक्रार केली आहे. मात्र अजूनही कारवाई होत नसल्याने बेंडवाल यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सत्ताधारी पक्षच उपोषणाला 

एखाद्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे. आरोग्य मंत्र्यांकडे मागणी करून देखील कारवाई होत नसल्याने राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला उपोषण करावे लागत असल्याने बुलढाण्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

SCROLL FOR NEXT