Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : ड्रग्स सदृश पदार्थ सेवनाने वर्षभरात सात जणांचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यात वाढले विक्रीचे प्रमाण

Buldhana News : खामगाव, लाखनवाडा आणि सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा या गावांमध्ये याचे मोठे जाळे असल्याचे बोलले जात आहे

Rajesh Sonwane

संजय जाधव 
बुलढाणा
: राज्यात ड्रग्सचा मुद्दा गाजत असताना आता बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्स सदृश पदार्थाची मोठ्या (Buldhana) प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. हे ड्रग्ज सदृश्य पदार्थांचे सेवन केल्याने मागील वर्षभरात सात जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर अनेकांचे मानसिक संतुलन सुटले आहे. (Live Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्सप्रमाणे दिसणाऱ्या पावडरची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. खामगाव, लाखनवाडा आणि सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा या गावांमध्ये याचे मोठे जाळे असल्याचे बोलले जात आहे. या अमली पदार्थाला ताडीची पावडर तर कुणी ड्रग्स म्हणत आहे. ही पावडर पाण्यामध्ये मिश्रित करून त्याचे सेवन केले जाते. हे प्रमाण वाढत चालले असून देखील यावर अपेक्षित अशी कारवाई होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विक्रेत्यांवर कारवाईची मागणी 

साखरखेर्डा गावात ड्रग्ज सदृश्य पदार्थाचे सेवन केल्याने वर्षभरात सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेक जणांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळे या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी साखरखेर्डा गावकऱयांनी केली आहे. तशी तक्रार एमआयएमच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT