Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana: फटाक्याची बारूद डोळ्यात गेल्याने गंभीर दुःखापत; युवक गंभीर जखमी

फटाक्याची बारूद डोळ्यांत गेल्याने गंभीर दुःखापत; युवक गंभीर जखमी

संजय जाधव

बुलढाणा : दोन वर्षानंतर दिवाळी सर्वत्र मोठ्या धामधूमीत साजरी केली जात आहे. जिकडे तिकडे फटाक्याची आतिषबाजी केली गेली. परंतु, फटाका फोडत असताना फटाक्‍याची बारूद डोळ्यात गेल्‍याने दुखापत झाल्‍याचा (Buldhana) प्रकार करडी या गावात घडली. (Letest Marathi News)

फटाके फोडताना (Diwali) काळजी घ्यायला हवी. परंतु, स्वतः काय काळजी घ्यावे हे विसरून फटाके फोडल्या जात आहेत. यामुळेच बुलढाणा तालुक्यातील करडी या गावात फटाका फोडत असताना घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास 22 वर्षीय विजय शिवणकर या युवकाने फटाके फोडताना काळजी घेतली नाही. फटाक्याची बारूद सरळ डोळ्यांत गेली. त्यामुळे डोळ्याला मोठी इजा होवून गंभीर दुःखापत डोळ्याला झाली.

तात्‍काळ उपचार

डोळा निकामी होतो की काय अशी भीती पालकांना वाटली. परंतु, वेळीच रात्री 12 वाजता बुलढाणा येथील डॉ. सुभाष जोशी यांच्या डोळ्याच्या (Hospital) हॉस्पिटलला आणण्यात आले. डॉ. जोशी यांनी विजयला ऑपरेशन थियेटरमध्ये नेऊन त्यांच्या डोळ्याची अत्याआधुनिक यंत्रणेद्वारे तपासाणी करून डोळा स्वच्छ केला व औषध उपचार केला. त्यामुळे डोळा वाचला; वेळीच उपचार मिळाल्याने विजयचा डोळा वाचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

Pune crime : पुण्यात अल्पवयीन गँगस्टर्सचा धुमाकूळ, गुन्हेगारी जगतातलं भयान वास्तव, पाहा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT