Sanjay Gaikwad Saam tv
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : मातोश्रीवर दहा खोके पोहचविले आणि तुपकरांचा पत्ता कट झाला; संजय गायकवाड यांचा आरोप

Buldhana News : बुलढाण्यात बोलताना संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय जाधव

बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी त्यांना बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी ही मिळत होती. एबी फॉर्म देखील तयार होता. मात्र रात्रीतून बुलढाण्यातील काही लोक मातोश्रीवर दहा खोके घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रविकांत तुपकर यांचा पत्ता कट झाला;  असा गंभीर आरोप बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांनी प्रचार सभेदरम्यान केला आहे.

बुलढाण्यात बोलताना संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी रविकांत तुपकर यांच्यावर निशाणा साधला आहे. तर संजय गायकवाड यांनी मातोश्रीवर दहा खोके पोहोचल्यामुळे रविकांत तुपकर यांचा पत्ता कट झाला व जयश्री शेळके यांच्या पतीने पाचशे कोटी रुपये नोटबंदीच्या काळात घोटाळा करून कमवले; असा आरोप केल्यामुळे (Buldhana) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीच्या बुलढाण्याच्या उमेदवार असलेल्या जयश्री शेळके यांचे पती सुनील शेळके यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटलं की, नोटबंदीच्या काळात मुंबईच्या लोकांनी जयश्री शेळके यांच्या राजर्षी शाहू बँकेत नोटा बदलविण्यासाठी एक हजार कोटी रुपये जमा केले होते. मात्र यांनी ५०० कोटीच्या वर पाठवले. त्यावेळेस सुनील शेळके हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यानंतर नोकरी सोडून दिली. आज-काल मुलांना नोकरी मिळत नाही. मात्र उपजिल्हाधिकारी पदावरचा माणूस नोकरी सोडूच कशी शकतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT