Malkapur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Malkapur Vidhan Sabha : मलकापूर विधानसभेत सेवानिवृत्त अधिकारी रिंगणात; भाजप व काँग्रेससमोर आव्हान

Buldhana News : सुनील विंचनकर हे मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. नुकतेच ते अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

संजय जाधव

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक दिग्गज आपले नशीब आजमावत असतात. त्यानुसार मलकापूर विधानसभा मतदारसंघात प्रशासनातील निवृत्त अधिकारी उतरले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात अद्यापही भाजप किंवा काँग्रेसकडून कुणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले अधिकारी म्हणून जिल्ह्यात परिचित असलेले सुनील विंचनकर यांच्या एंट्रीने मलकापूर मतदारसंघात आता चुरस वाढली आहे.

सुनील विंचनकर हे मलकापूर (Malkapur) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. नुकतेच ते अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. उद्या (२४ ऑक्टोम्बर) मलकापूर (Vidhan Sabha Election) विधानसभा मतदारसंघात निष्पक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अनेक वर्ष शासकीय सेवेत राहून जनतेची सेवा केली. मात्र ती सेवा करत असताना निर्बंध असायचे, म्हणून आता राजकारणात येऊन जनतेची पूर्ण वेळ सेवा करण्याचा मनोदय केला आहे. त्यामुळे मलकापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जनता मला मदत करत आहे आणि ही जनतेने लढाई हातात घेतलेली आहे. 

उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम 

निष्पक्ष उमेदवार असल्याने कुणाचे आव्हान नाही. मात्र राजकीय पक्षाचा विचार केला तर चैनसुख संचेती हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी मलकापूर अर्बन बँक बुडवून लाखो लोकांचे कोट्यावधी रुपये बुडवले आहेत. त्यामुळे लोक त्यांना मतदान करणार नाहीत. माझं ध्येय फक्त माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या मलकापूर मतदारसंघाचा विकास करावा. बेरोजगारांना रोजगार मिळावा, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा व्हाव्यात व मतदार संघाचा विकास व्हावा; यासाठी लढत असल्याचे सांगितले. कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही व ही निवडणूक मी लढणारच. मलकापूर विधानसभा मतदारसंघातील हजारो युवक शेतकरी व माझ्या जन्मभूमी कर्मभूमीतील मतदारांनी ही लढाई हातात घेतली आहे त्यामुळे माझा प्रचारही तेच करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

Pakistan Blast: इमारतीत भीषण स्फोट; पाकिस्तान हादरलं! ९ मुलांसह १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

Viral Video: शूज लपवण्यात मेव्हणीचा मास्टरस्ट्रोक; नवऱ्याचे शूज अशा ठिकाणी लपवले की शोधूनही सापडणार नाहीत!

Maharashtra Live News Update : . नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

SCROLL FOR NEXT