Lonar Lake Saam tv
महाराष्ट्र

Lonar Lake : लोणार सरोवर परिसरात करता येणार प्री वेडिंग शूट; पुरातत्व विभागाला द्यावी लागणार इतकी रक्कम

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले लोणार सरोवर हे वारसा स्थळ असून दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे येथे प्री- वेडिंग शूट करण्यास मोठी मागणी होती

संजय जाधव

बुलढाणा : आजकाल लग्ना अगोदर प्री वेडिंग शूटिंगच फ्याड सुरु आहे. यासाठी चांगले स्पॉट निवडून त्याठिकाणी शुटिंग करण्यात येत असते. प्रामुख्याने निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या प्रचलित ठिकाणी जाऊन शूटिंग केली जाते. त्यानुसार प्री वेडिंग शूटिंगसाठी राज्यभरातून लोणार सरोवर परिसरात अनेक जण येत असतात. मात्र याठिकाणी शूटिंग करण्यास पुरातत्व विभागाकडून परवानगी दिली जात नसते. परंतु आता या ठिकाणी प्री वेंडिंग शूट करता येणार असनू यासाठी पुरातत्व विभागाला रक्कम मोजावी लागणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले लोणार सरोवर हे महत्त्वपूर्ण वारसा स्थळ असून दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे येथे प्री- वेडिंग शूट करण्यास मोठी मागणी होती. मात्र हे स्थळ पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने येथे प्री वेडिंग शूटिंग करता येत नव्हते. त्यामुळे उपवर वधू यांचा हिरमोड होत होता. मात्र आता पुरातत्व विभागाकडून शूट करण्यास परवानगी दिली आहे. 

मोजावे लागणार ३५ हजार रुपये 

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि परिसरातील ऐतिहासिक स्थळांवर प्री- वेडिंग शूटसाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने मान्यता दिली आहे. यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमानुसार आता येथे प्री-वेडिंग शूटसाठी ३५ हजार रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, इच्छुक जोडप्यांना किमान सात दिवस आधी बुकिंग करणे बंधनकारक असेल.

नुकसानीची जबाबदारी आयोजकांवर 

मात्र, पुरातत्त्वीय ठिकाणांचे संरक्षण आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी पुरातत्त्व विभागाने हे शुल्क निश्चित केले आहे. इच्छुक जोडप्यांना अधिकृत संकेतस्थळावरून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच, शूटिंग दरम्यान कोणतेही नुकसान होणार नाही, याची जबाबदारी आयोजकांवर असेल. अशी माहिती पुरातत्व विभागाने प्रसिद्ध केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

Gudi Padwa Speech: यंदाच्या गुढीपाडव्याला चिमुकल्यांना शिकवा हे सोपं भाषण, सोसायटीत होईल तुमच्याच मुलाची चर्चा

VIDEO : अशी ही पळवापळवी! सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलिंडर जमावानं पळवले

आधी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस – “हम जो फैसले करते हैं, खुलेआम करते हैं; काही तासांतच बेडरूममध्ये आढळला विवाहित महिलेचा मृतदेह

Maharashtra Politics: ...त्यानंतरच राहुरी पोटनिवडणूक लढवण्याबाबत निर्णय, प्राजक्त तनपुरेंच्या मनात नेमकं काय? फडणवीसांचंही केलं कौतुक

SCROLL FOR NEXT