Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Buldhana News : नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. अनेकांचे उपवास हे फराळावर सुरु आहेत. एकवेळ फराळ करून महिलावर्ग उपवास करत आहे

संजय जाधव

बुलढाणा : सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. यामुळे अनेकांचे उपवास सुरू असून या उपवासासाठी भगरीचा भात खाल्ल्याने काही महिलांना विषबाधा झाली. देऊळगावराजा तालुक्यातील सरांबा, टाकरखेड या गावातील महिलांना त्रास झाला असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. अनेकांचे उपवास हे फराळावर सुरु आहेत. एकवेळ फराळ करून महिलावर्ग उपवास करत आहे. अशाच प्रकारे (Buldhana News) बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील सरांबा व टाकरखेड येथील महिलांनी उपवास असल्याने भगर करून खाल्ली. मात्र भगर खाल्ल्यानंतर गावातील काही महिलांना मळमळ व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. रुग्णालयात तपासले असता भगरीतून (Food Poision) विधाबाधा होऊन त्रास होत असल्याचे समोर आले आहे.  

दरम्यान महिलांनी भगरची उसळ खाल्याने मळमळ व पोटदुखी व्हायला लागल्याने त्यांना तातडीने देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णाल्यात भरती करण्यात आले. त्यात भगर खाल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले. यातील ९ महिलांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यातवर उपचार् सुरु आहे. तर काहीना खाजगी रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT