Buldhana Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: शेतकऱ्यांनो, काळजी घ्या! रानात औषध फवारणी करताना विषबाधा, एकाचा मृत्यू, ३ जण रुग्णालयात

Buldhana Latest News: औषध मारताना विषबाधा झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला असून ३ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १९ जुलै २०२४

शेतात मकाच्या कंसात प्युरी औषधी टाकत असताना त्रास होऊन वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धामणगाव बढे येथे ही घटना घडली असून औषध मारताना विषबाधा झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला असून ३ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या ग्राम धामणगावबढे येथील 60 वर्षीय दामोदर नारायण जाधव व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य आपल्या शेतात गेले होते. यावेळी ते शेतातील मकाच्या कंसात कीड होऊ नये म्हणून प्युरी औषधी टाकत असताना काही जणांना मळमळ व उलट्या होऊ लागले.

याबाबतची माहिती मिळताच तात्काळ नातेवाईकांनी त्यांना धामणगावबढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.

दरम्यान, दामोदर नारायण जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले आहे तर मोहन देवानंद जाधव (वय 12 वर्ष) बेबीबाई शिवाजी जाधव (वय, 57 वर्ष) आणि सुभद्राबाई लक्ष्मण जाधव (वय, 60 वर्ष) यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT